दिल्लीतील चोर गोंदिया पोलिसांकडून जेरबंद
गोंदिया : बंद घरांचे कुलूप तोडून चोऱ्या करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात गोंदिया पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिल्लीतील दोन जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या तीन घरांचे कुलूप तोडून या टोळीने मुद्देमाल पळविला होता. चोरीतील २.१०0 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांनी जप्त केले आहेत. यासंदर्भात चार जणांना अटक करण्यात आली आहे. २२ जानेवारीला कन्हारटोली येथील रामकृष्ण सत्संग मंडळ परिसरातील रहिवासी हेमंत लिल्हारे, आझाद वॉर्ड वसंतनगर येथील रहिवासी सविता उखरे यांच्यकडे चोरी झाली होती. ३० जानेवारीला रिंग रोडवरील गाडगेनगर येथील रहिवासी अजय होशिलाप्रसाद मिश्रा यांच्या घरांतून चोरट्यांनी ऐवज पळविला होता.