कृषी कायद्या विरोधात काही पक्षांची जाणीवपूर्वक ढोंगबाजी-फडणवीस

Share This News

महाराष्ट्रात कृषी विधेयक येऊन इतके दिवस झाले परंतु कुठलही आंदोलन महाराष्ट्रात झाले नाही, त्यामुळे काही पक्ष जाणीवपूर्वक ढोंगबाजी करत असल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. नव्या कृषी कायद्यासंदर्भात  शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असून  शेतकऱ्यांना चुकीच्या गोष्टी सांगण्यात येत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. 

 काँग्रेस पक्षाने आपल्या 2019 च्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं की  बाजारसमित्या रद्द करा आणि आम्ही सत्तेत आलो तर बाजारसमित्या रद्द करू त्यांनी आता उत्तर दिलं पाहिजे असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला. 2006 साली कंत्राटी शेतीचा कायदा त्यांनी का मंजूर केला याचं उत्तर दिलं पाहिजे,तसेच 2020 पर्यंत तो कायदा सुरू आहे, यांना महाराष्ट्रात हा कायदा चालतो मग केंद्राचा का नाही,त्यामुळे ही ढोंगबाजी नाही तर अजून काय अशी खरमरीत टीका फडणवीस यांनी केली. महाराष्ट्रात 29 थेट खरेदी चे लायसन्स काँग्रेस राष्ट्रवादी ने दिले, चिखली बाजार समितीमध्ये  थेट खरेदी चे कार्पोरेट ला दिले, केंद्र सरकार तर ते देखील देत नाहीय. शेतकऱ्यांचा या मोर्च्याला काहीही पाठिंबा नाही, उलट शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने तर या कृषी कायद्यांचे स्वागत केले असल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले. 

भंडाऱ्यात आज भाजपचा मोर्चा – 
भंडाऱ्यामध्ये भाजपचा वेगवेगळ्या मागण्याकरिता मोर्चा आहे. सगळ्यात आधी धान खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे.  जे पैसे शेतकऱ्याला मिळायला पाहिजे होते ये काही धनदांडग्यांनी मिळून लाटून नेलेले आहे. आणि अक्षरशः त्या ठिकाणीं बोगस माल हा एफसीआयला  देण्यात येत असून अतिशय मोठा धान घोटाळा हा मिळून केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. त्यासोबत ज्या प्रकारे वीजबिलाच्या संदर्भात या सरकारने जनतेशी बेईमानी केली  आहे, त्या बेईमानीच्या विरोधात हा मोर्चा असल्याचं फडणवीस म्हणाले. वाढीव वीजबिल  पाठवले आहेत आणि आता सरकार विजेचे कनेक्शन कापायची सुरुवात केलेली आहे,सोबतच भंडारा सामान्य रुग्णालयातली घटना अत्यंत गंभीर आहे, आरोपींवर अजून गुन्हा दाखल झाला नाही, म्हणून आम्ही मोर्चा काढत असल्याचं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.