मेडिकल प्रशासनाकडून ५00 ऑक्सिजन सिलेंडरची मागणी

Share This News

नागपूर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गंभीर संवर्गातील कोरोनाबाधित दाखल होत आहेत. सुमारे सहाशे कोरोनाबाधित रुग्ण येथे उपचार घेत आहेत. त्यांना ऑक्सिजन कमी पडू नये, यासाठी अधिकची मागणी प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
दाखल होणार्‍या अनेक कोरोनाबाधितांना ऑक्सिजनची गरज पडत आहे. यामुळे ऑक्सिजनची मागणीही वाढत आहे. मेडिकलमध्ये अतिरिक्त ऑक्सिजनचा साठा प्रशासनाकडे असावा, जेणेकरून अनुचित प्रकार घडू नये यासाठी मागणी करण्यात आल्याचे मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी नमूद केले. सध्या नागपुरात तीन ऑक्सिजन प्लान्ट असून तुटवडा नाही. मात्र, वाढती गरज लक्षात घेऊन भिलाई येथूनही ऑक्सिजन मागविले जात आहे. मेडिकलमध्ये सध्या २0 किलो लिटरचे तीन प्लान्ट लावण्यात आले आहेत. यामुळे मेडिकलमध्ये एकूण ६0 किलो लिटरचे ऑक्सिजन प्लान्ट आहेत. या प्लान्टमधील लिक्विड ऑक्सिजन चार ते पाच दिवस सुरू असते. यामुळे हा अवधी मिळतो. तर मेयोतही सुमारे २0 किलो लिटरचे प्लान्ट असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, व्हेंटिलेटवर असलेल्या एखाद्या रुग्णाला १00 टक्के ऑक्सिजनची गरज पडते. मात्र, शासनाने सप्टेंबर २0२0 मध्ये १00 टक्केऐवजी १२ लिटर म्हणजे ६८ टक्केच ऑक्सिजन द्यावा, असे धोरण ठरवले होते. आता निर्णय रद्द करण्यात आला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.