सट्टापट्टी घेणाऱ्यांवर देवरी पोलिसांची धडक कारवाई

Share This News

चिचगड :देवरी पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या शहरातील एका दुकाना मोबाईलवर सट्टापट्टी घेत असल्याची गुप्त माहिती पोलीस विभागाला मिळताच देवरीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या पथकाने धाड घालत कारवाई केली. नंदकिशोर हरिशाम शाहू (33,रा.देवरी) दुकानात बसून मोबाईलवर सट्टापट्टी घेत असल्याचे झडती दरम्यान दिसून आले.त्यावेळी तो मणिपूर, कल्याण, वरली मटका सट्टापट्टी,जुगार खेळ व सट्टापट्टी घेतांना रंगेहाथ आढळल्याने आरोपीला अटक करण्यात आली.त्याच्याकडून मोबाईल किंमत 3000रु व नगदी 1010 रु असा मुद्देमाल जप्त करुन  62/2021 कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधिक्षक विश्व पानसरे,अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,उपविभागीय पोलीस अधिकारी जालंधर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे, पोउपनि उरकुडे, पोहवा मडावी, पो ना बोहरे, पो शि भांडारकर, पो शि हातझाडे यांनी केली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.