लॉकडाऊन करण्यापूर्वी त्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करा

Share This News

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांची इशारेवजा सूचना

मुंबई ः लॉकडाऊनमुळे रोजगार बुडणाऱ्या लोकांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करा व नंतरच लॉकडाऊनचा विचार करा, असा इशारेवजा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारला दिला आहे.
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना सर्वच स्तरातून लॉकडाऊनला वाढता विरोध आहे. त्यामुळे सरकारने काही मुद्दे विचारात घेतले पाहिजे, असे नमूद करून चव्हाण म्हणाले की, लॉकडाऊनमुळे रोगजार बुडणाऱ्यांच्या बँक खात्यात सरकारने थेट रक्कम जमा करावी, त्यासाठी आमदार, खासदार निधीचाही वापर करता येईल, लॉकडाऊनची पूर्वसूचना जनतेला द्यावी, लॉकडाऊनचा कालावधी कमीत कमी ठेवावा, खासगी वाहनातून प्रवासास मुभा असावी, शेतमाल व औद्योगिक मालाच्या वाहतुकीवर परिणाम होऊ नये, लसीकरणाचे प्रमाण वेगाने वाढविण्याची गरज आहे, असेही चव्हाण यांनी पत्राच्या माध्यमातून नमूद केले आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.