खुद्द पोलीस महासंचालक मैदानात, हेमंत नगराळे पूजा चव्हाण केसची माहिती घेण्यासाठी पुण्यात
पुणे : खुद्द राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे आता पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची माहती घेण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. याअगोदर हेमंत नगराळे यांनी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
पुणे पोलिसांकडून पोलिस महासंचालकांना प्राथमिक रिपोर्ट सादर
पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा प्राथमिक रिपोर्ट राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांना सादर केला होता. त्यानंतर ते आता पुण्यात आल्याने त्यांचा हा पुणे दौरा विशेष महत्त्वाचा मानला जातोय.
पुणे पोलिसांचं पथक यवतमाळला
पुणे पोलिसांचं पथक देखील यवतमाळला गेलं आहे. तिथे जाऊन ते या घटनेचे आणखी काही धागेदोरे मिळतायेत का? याची झाडाझडती घेत आहे. शासकिय पातळीवरुन देखील या प्रकरणाच्या चौकशीसाठी वारंवार विचारणा होत असल्याने पुणे पोलिस वेगाने सूत्रं फिरवत आहेत.