नगर परिषद आर्वी मध्ये प्रहार चे ढोलताशा आंदोलन Dholtasha movement of Prahar in Nagar Parishad Arvi

Share This News

आर्वी जिल्हा वर्धा येथे नगर परिषद आर्वी मध्ये प्रहार चे बाळा जगताप यांच्या नेतृत्वात कोरोनाचे सर्व नियम पाळून ढोलताशा आंदोलन करण्यात आले… कोरोणा चा पुन्हा होत असलेला संक्रमण काळ लक्षात घेता.. आर्वी मधील काही धनदांडग्या लोकांनी राजकीय व्यक्तींना हाताशी धरून शासकीय जागी अतिक्रमण करून ती जागा हडपन्याचा डाव आखला आहे.. रात्री लोक झोपल्यानंतर त्या जागेवर बांधकाम करीत आहे.. आणि या कारणामुळे शहरात वेगळीच चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे गरीब सामान्य अपंग व्यक्तींचे अतिक्रमणाच्या नावावर दुकाने पडायची.. त्यांना रस्त्यावर आणायचे आणि दुसरीकडे धनदांडग्यांना मात्र राजरोसपणे अतिक्रमणाला आणि बांधकामाला मुभा द्यायची हे नगर परिषद प्रशासनाचे दुटप्पी धोरण बरोबर नाही..त्यामुळे जोपर्यंत केलेलं धनदांडग्यांच अतिक्रमण हटत नाही.. सर्वांना सारखा न्याय मिळत नाही तोपर्यंत प्रहार संघटनेचे दोघे जन दररोज तहसील कार्यालय आणि नगर परिषद कार्यालय समोर ढोलताशा आंदोलन चालूच ठेवेल.. अस प्रहारचे बाळा भाऊ जगताप यांनी सांगितले…


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.