टाेल नाक्यांवर फास्टॅग स्कॅन हाेण्यास अडचणी Difficulty getting fastag scans on tail noses
नागपूर : १५ फेब्रुवारीपासून टाेल नाक्यांवर इलेक्ट्रानिक्स टाेल वसुली बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र काही टाेल नाक्यांवर बॅलेन्स असूनही फास्टॅग स्कॅन हाेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे नाक्यांवरील कर्मचारी वाहनचालकांवर दुप्पट टाेल आकारत असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारामुळे वाहनचालकांची फसल्यागत अवस्था हाेत आहे. असाच एक प्रकार वर्धा राेडवरील हळदगाव टाेल नाक्यावर दुपारी ३.२८ वाजताच्या दरम्यान निदर्शनास आला. येथे एमएच-३१, सीक्यू ३४५० क्रमांकाचा एक टॅंकर फास्टॅगच्या लेनमध्ये लागला पण नाक्यावर लागलेल्या स्कॅनरमध्ये त्या टॅंकरचे कार्ड स्कॅनच झाले नाही. टॅंकर मालक व ट्रान्सपाेर्टर अमित गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी टाेल नाक्यावरील कर्मचाऱ्याने संबंधित बॅंकेचे फास्टॅग कार्ड चालत नसल्याचे सांगितले. वाहनाचे पेपर जप्त करण्याची धमकी सुद्धा दिली. एवढेच नाही तर येथील कर्मचारी विशिष्ट बॅंकेकडूनच फास्टॅग कार्ड बनविण्यासाठी जाेर देत हाेते. गुप्ता यांनी सांगितले की त्यांनी नावाजलेल्या बॅंकेतून फास्टॅग कार्ड बनविले आहे आणि ती बॅंक एनएचएआयद्वारा मान्यताप्राप्त आहे. याच अकाऊंटवर त्यांच्या १२ वाहनांचे फास्टॅग जुळलेले आहेत. देशभरात चालताना कुठल्याच टाेल नाक्यावर अडचण आली नाही पण या नाक्यावर अडचण कशी, हा सवाल त्यांनी केला. फास्टॅगमध्ये बॅलेन्सचीही समस्या हाेण्याची शक्यता नाही कारण खात्यावर बॅलेन्स १००० रुपयावर आल्यानंतर बॅंकेद्वारे १५००० रुपयाचा ऑटाेरिचार्ज केला जाताे. त्यांनी सांगितले, ज्यावेळी गाडी हळदगाव टाेल नाक्यावर उभी हाेती, त्यावेळी फास्टॅगमध्ये १० हजार रुपये बॅलेन्स हाेते. असे असताना टाेल नाक्यावरील चुकीसाठी २५० रुपयांऐवजी ५२० रुपये मागण्यात येत हाेते. टाेल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी वाहनचालकाशी हाेणाऱ्या व्यवहाराबाबत एनएचएआयच्या अधिकाऱ्यांशी बाेलणी केल्यानंतर प्रकरण मिटवण्यात आले. दरम्यान गुप्ता यांनी या प्रकरणात नॅशनल हायवे ऑथारिटी ऑफ इंडिया (एनएचएआई) च्या १०३३ या तक्रार क्रमांकावर संपर्क केला पण यावरून व्यवहारिक रुपात मदत मिळू शकली नाही.