दिलीप गांधी यांचे आकस्मिक निधन वेदनादायी : देवेंद्र फडणवीस Dilip Gandhi’s sudden demise is painful: Devendra Fadnavis

Share This News

मुंबई, 17 मार्च  अहमदनगरचे माजी खासदार आणि  भाजप नेते  दिलीप गांधी यांच्या निधनावर  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते  देवेंद्र फडणवीसांनी तीव्र शोक व्यक्त केला. ट्वीटर द्वारे आपल्या भावना व्यक्त करताना  देवेंद्र फडणवीस म्हणाले, “माजी खासदार दिलीप गांधी यांचे असे अकस्मात आपल्यातून निघून जाणे अतिशय वेदनादायी आणि दुःखद आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील भाजपाच्या संघटनात्मक बांधणीत अगदी महाविद्यालयीन काळापासून त्यांचे योगदान, विविध सामाजिक कार्य आणि एक उमदा लोकप्रतिनिधी म्हणून केलेले कार्य सदैव स्मरणात राहील.  दिलीप गांधी यांना  भावपूर्ण श्रद्धांजली.त्यांचे कुटुंबीय, आप्त परिवार आणि सर्वच कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी मी प्रार्थना करतो. ॐ  शांती  “


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.