विदर्भ, मराठवाड्यासाठी निराशाजनक अर्थसंकल्प : मुनगंटीवार Disappointing budget for Vidarbha, Marathwada: Mungantiwar

Share This News

मुंबई : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा पूर्णणे दिशाहीन आहे. त्यांनी विदर्भ व मराठवाड्याला दिलेला निधी एक टक्क्यांनी कमी केला. महाविकास आघाडी सरकारमधील नेते विदर्भातील नेत्यांना, मंत्र्यांना विदर्भाच्या विरोधातच वापरत आहे. विदर्भातील नेत्यांना महत्त्वाची खाती देण्यापेक्षा त्यांना थातुरमातुर खाती देण्यात आल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी अर्थमंत्री तथा चंद्रपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
विधान सभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान त्यांनी सरकारवर तोफ डागली. तत्कालीन भाजप सरकारने विदर्भ-मराठवाड्याला विकासासाठी भरभरून दिली दिला. मात्र महाविकास आघाडी सरकारने एक टक्क्यांहून अधिक निधी कापल्याचे ते म्हणाले. विदर्भात अनिल देशमुख, सुनील केदार, विजय वडेट्टीवार, डॉ. नितीन राऊत यांच्यासारखे चांगले नेते आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकार तुमच्या सारख्या नेत्यांचा तुमच्याच विदर्भाच्या विरोधात वापर करीत असल्याचे मुनगंटीवार यांनी नमुद केले. सभागृहात बोलत असताना मुनगंटीवार यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांना प्रत्युत्तर देताना मुनगंटीवार नाना तुम्ही महाराष्ट्राचे पप्पु बनू नका असा टोला लगावला.

विदर्भासाठी प्राण गेले तरी बेहत्तर
विदर्भाच्या प्रश्नावर किती लढाल असा प्रश्न नाना पटोले यांनी करताच मुनगंटीवार यांनी तितक्याच ताकदीने त्यांना उत्तर दिले. विदर्भाने सहावेळा सभागृहात पाठविले आहे. त्यामुळे विदर्भासाठी प्राण गेले तरी बेहत्तर. ही वेळ विदर्भातील जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याची आहे, असे मुनगंटीवार यांनी म्हणताच विधान सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.