भंडारा जिल्हा रुग्णालयात अनर्थ टळला..

Share This News

भंडाराः भंडारा जिल्हा रुग्णालयात दहा बालकांचा बळी जाण्याचे प्रकरण ताजेच असताना शुक्रवारी रात्री रुग्णालयाच्या कोव्हीड वॉर्डात ऑक्सीजनच्या पाईपचा स्फोट होऊ आग लागण्याची घटना घडली. मात्र, ही आग तात्काळ आटोक्यात आणली गेल्याने अनर्थ टळला.
भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असून रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेऊन नेत्र रुग्ण विभागातही कोव्हीड वॉर्ड सुरु करण्यात आला आहे. या वॉर्डात ऑक्सीजनच्या पुरवठ्यासाठी नवी पाईपलाईन टाकण्यात आली. शुक्रवारी रात्री या पाईपलाईनमधून अचानक ऑक्सीजनची गळती सुरु झाली व पाईपचा स्फोट होऊन आग लागली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीन वॉर्डातून रुग्णांना बाहेर काढून आग विझविली. या घटनेत कुठलीही हानी झाली नसल्याचा दावा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे. रुग्णांसाठी ऑक्सीजनची पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून सेंट्रलाईज ऑक्सीजन पुरवठा यंत्रणा रविवारी सायंकाळपर्यंत पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.