गोसेवा संस्थान पथमेडा संस्थापक श्री दत्तशरणानंदजी महाराज यांचं गुरुवारी नागपुरात प्रवचन
श्री गोधाम महातीर्थ पथमेडा येथील श्रद्धेय गोऋषी स्वामी श्री दत्तशरणानंदजी महाराज यांच्या अमृत वाणीचे आयोजन गुरवार ४ फेब्रुवारीला नागपुरात करण्यात आले आहे. हिवर्णी नगर येथील माहेश्वरी भवनात या अमृत वाणीचे आयोजन करण्यात आले आहे. श्री दत्तशरणानंदजी महाराज यांचं गुरुवारी संध्याकाळी नागपुरात आगमन होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत माहेश्वरी भवनात त्यांच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे. जगातील सर्वात मोठी गोशाळा ही महातीर्थ पथमेडा येथे असून या गोशाळेची स्थापना श्री दत्तशरणानंदजी यांनी केली आहे. नागपूरच्या वेदलक्षणा गोसेवा समितीने गोभक्तांना या सत्संगासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.