नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा वाद न्यायालयात Dispute over the post of Registrar of Nagpur University in the court

Share This News

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एका याचिकेच्या माध्यमातून आव्हान देण्यात आले आहे.


अशोक शंकर खोब्रागडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी न्या. नितीन जामदार आणि न्या. अनिल किलोर यांनी राज्य सरकार आणि नागपूर विद्यापीठाला नोटीस बजावली आहे. खोब्रागडे हे कला व वाणिज्य रात्रकालीन महाविद्यालयात ग्रंथपाल आहेत. त्यांची श्रेणी प्राध्यापकांच्या समक्षक आहे. त्यामुळे ते विद्यापीठाच्या कुलसचिवपदासाठी पात्र आहेत. त्यामुळे त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम यांचा कार्यकाळ संपल्यानंतर कुलसचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. नीरज खटी यांच्याकडे आला. ३० जून २०१८ पासून डॉ. खटी काम पहात होते. त्यानंतर नागपूर विद्यापीठाने कुलसचिव पदाची भरती प्रक्रिया राबवली. त्यासाठी रितसर जाहिरातही दिली. मात्र अशातच राज्य सरकारने थेट आदेश काढत डॉ. हिरेखन यांची कुलसचिव पदावर नियुक्ती केली. त्यामुळे खोब्रागडे यांनी याचिका दाखल केली. त्यांच्यावतीने अ‍ॅड. आनंद परचुरे यांनी बाजू मांडली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.