अर्ध्या शहरात कचरा संकलन बाधित

Share This News

नागपूर
शहरातील झोन क्रमांक ६ ते १0 येथील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या बीव्हीजी कंपनीने अचानक ११३ कर्मचार्‍यांना काढून टाकल्यानंतर अर्ध्या शहरातील कचरा संकलन प्रक्रिया बाधित झाली आहे. सलग तिसर्‍या दिवशी देखील येथील कचरा उचल झालेली नाही.

कंपनी आणि मनपा प्रशासनाकडून या आंदोलनावर कुठलाही तोडगा निघाला नाही. परिणामी, सफाई कर्मचारी सोमवारी महापालिकेवर धडकले. पोलिसांनी काहींना ताब्यात घेतले. शहर काँग्रेसकडून सफाई कर्मचार्‍यांना साथ दिली. काँग्रेेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, मनोज सांगोळे, बसपाचे मोहम्मद जमाल व नगरसेविका आभा पांडे आदींचे शिष्टमंडळ आयुक्त राधकृष्णन बी. यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले असता पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. १२ जणांना ताब्यात घेतल्यानंतर अन्य कर्मचार्‍यांना पळवून लावले. सबब प्रश्नावर चर्चेअंती आयुक्तांनी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे. बीव्हीजी कंपनीला कंपनीला ७५0 कर्मचार्‍यांचीच गरज आहे. हे कर्मचारी मनपा आस्थापनेवर नसल्याने व कंपनीला कंत्राट दिला असल्याची भूमिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मांडली.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.