संधीच्या बंधनामुळे एमपीएससी परीक्षार्थ्यांची नाराजी Dissatisfaction of MPSC candidates due to opportunity constraints

Share This News

नागपूर : एमपीएससीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने खुल्या गटासाठी ६, ओबीसीसाठी ९ संधी ठरवून दिल्या आहेत. यानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला आणि तो अर्ज आयोगाला मिळाला किंवा परीक्षार्थी परीक्षेला गैरहजर राहिला तरी ती संधी समजली जाईल. संधीचे बंधन लावल्यामुळे विद्यार्थ्यांवर दबाव वाढणार असून संधीची अट काढून टाकावी, अशा प्रतिक्रिया एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना संधीचे बंधन घालून देण्यात आले आहे. परंतु यूपीएससीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर पूर्व, मुख्य आणि मुलाखत एका वर्षात पार पडते. परंतु एमपीएससीच्या परीक्षा वेळेत होत नाहीत. पूर्व, मुख्य आणि मुलाखतीसाठी दीड वर्ष लागते. एखाद्या वेळी परीक्षा पुढे ढकलल्यास अडीच वर्षाचा कालावधी लागतो. निवड झालेल्या उमेदवारांना दीड वर्षापर्यंत नेमणूक देण्यात येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. नेमणूक न दिल्यामुळे त्यांना आंदोलन करण्याची गरज भासते. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षा यूपीएससी प्रमाणे वर्षभरात पूर्ण करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.