मेडिकलमध्ये डॉक्टरांचे कोरोनाबाधित होण्याचे सत्र सुरूच

Share This News

 नागपूर
शहर व ग्रामीण भागासोबतच आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) चे स्टाफही कोरोनाबाधित आढळून येत आहे. रविवारी पेइंग वॉर्डात ६ निवासी व ३ एमबीबीएसचे विद्यार्थी भर्ती झाले. आजवर मेयो, मेडिकल येथील कर्मचारी, डॉक्टर व विद्यार्थी असे जवळपास ४२ वर लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

पेइंग वॉर्डात भरती झालेले निवासी डॉक्टर हे सर्जरी व एनेस्थिशिया विभागातील असल्याचे सांगण्यात येते. यातील काहींची कोरोनाची आरटीपीसीआर तपासणी ही निगेटिव्ह आली होती. परंतु सिटी स्कॅनमधून कोरोना असल्याचे लक्षात आहे व त्यांना भरती करण्यात आले. आजवर मेडिकलमधील १0 निवासी डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात येते. याशिवाय एमबीबीएसच्या नवीन बॅचचे विद्यार्थी सर्वाधिक बाधित होत असल्याची माहिती आहे. रविवारला ३ परिचारिकाही कोरोनाबाधित आढळून आल्या आहेत.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.