मनसे तर्फे साडेतीनशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण
डोंबिवली, १० नोव्हेंबर, : लॉकडाउनच्या कालखंडात प्राप्त झालेल्या पालकांना दिलासा मिळावा म्हणून घारीवली गावचे माजी सरपंच योगेश पाटील यांनी आपला १६ जून रोजी होणारा वाढदिवस रद्द केला होता तर वाढदिवसाला होणारा खर्च ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत साडेतीनशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले आहे.तसेच मनसे आमदार राजू पाटील यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन दिपावलीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या. लॉकडाऊनच्या कालखंडात पालकांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येणारा वाढदिवस साजरा न करता घारीवली गावचे माजी सरपंच योगेश रोहिदास पाटील यांनी घारीवली, उसरघर, संदप आणि काटई या गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या जवळपास साडेतीनशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य करणार असल्याचे आश्वासन दिले होते.
मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या कार्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले आहे.तसेच आमदार पाटील यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन दिपावलीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या.