काटोल ग्रामीण रुग्णालयाला सहा ऑक्सिजन मशिन दान

Share This News

काटोल
कोविड वैष्णव महामारी या गंभीर आजारामुळे वाढती रुग्ण संख्या बेड, ऑक्सिजनच्या पुरेश्या व्यवस्थेअभावी अनेकांना प्राणास मुकावे लागत असताना काटोल उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी सोलर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला प्रस्ताव दिला. त्यांनी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता स्थानिक काटोल ग्रामीण रुग्णालयाला सहा ऑक्सिजन मशिन शुक्रवार, १६ मार्चला रोजी दान दिल्या.
नागपूर शहरात हॉस्पिटलमध्ये वाढते कोरोनाबाधित रुग्णांमुळे व्यवस्था तोकडी पडत आहे. काटोल ग्रामीण रुग्णालयात तालुक्यासोबत नरखेड येथील रुग्ण उपचार घेत आहे. सोलर ग्रुपचे मदतीने आता ऑक्सिजन लागणार्‍या कोविड रुग्णाला काही अंशी दिलासा मिळाला आहे. सोलर इंडस्ट्रीजचे प्रबंधक सत्यनारायण नुवाल यांनी जनरल मॅनेजर सोमेश्‍वर मुंदडा यांना त्वरित साहित्य पुरविण्याचा होकार दिला. त्यांनी ३ लाख ३0 हजार किंमतीचे सहा ऑक्सिजन मशीन ग्रामीण रुग्णालयाचे सुपूर्त केले.
कोविड जीवघेणा आजारावर शासन पूर्ण प्रयत्नरत आहे. कोविडचा वाढता प्रादुर्भाव व होणारी गंभीर परिस्थितीला आटोक्यात आणण्याकरिता सोलर ग्रुपचे संचालक सत्यनारायण नुवाल यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. परिसरातील सेवाभावी, सामाजिक संस्थांना यामुळे प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी व्यक्त केली. चाकडोह, शिवा अडेगाव परिसरात कार्यक्षेत्र असणारे सोलर इंडस्ट्रीजचे सामाजिक क्षेत्रात सतत योगदान राहिले आहे. संकटकाळी परिस्थितीत परिसरात लागलेल्या आगेच्या घटनेत चार अग्निशमन बंब, पाण्याचे टँकर सदैव तत्परतेने अनेक घटनेत मदतीला येऊन वनसंपदा, अन्य संपत्तीचे नुकसान वाचविण्यास यशस्वी ठरली आहे. स्वच्छता अभियानात नुकतेच बाजारगाव ग्रा. पं.ला कचरा वाहतूक वाहन, परिसरात अनेक ग्राम पंचायतीला मदत, वृक्षारोपण आशा अनेक राष्ट्रीय अभियानात कंपनीचा सदैव सहभाग असल्याचे प्रतिक्रिया जनरल व्यवस्थापक सोमेश्‍वर मुंदडा यांनी याप्रसंगी दिल्या.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.