डबल म्युटेंट कोरोनाने हादरला महाराष्ट्र

Share This News

मुंबई : डबल म्युटेंट कोरोनाने महाराष्ट्राची झोप उडवली आहे. डबल म्युटेंटमुळेच रुग्णवाढीचा उद्रेक होत असल्याचं आता समोर आलं आहे.
महाराष्ट्र, दिल्ली,पंजाबमध्ये डबल म्युटेंट सापडला आहे. E484Q आणि L452R हे कोरोनाचे दोन वेगवेगळे स्ट्रेन आहेत. काही राज्यांमध्ये मात्र हे दोन्ही स्ट्रेन एकत्रित रुपानं समोर आले आहेत. महाराष्ट्र, पंजाब आणि दिल्लीत या डबल म्युटेशनचा फैलाव झाल्याचं रिपोर्टमधून समोर आलं आहे.

असा असतो कोरोना विषाणू

कोरोना विषाणूत स्पाईक प्रोटिन नावाचा एक घटक असतो. स्पाईक प्रोटिनच्याच मदतीनं कोरोना विषाणू माणसांच्या पेशींमध्ये चिटकून बसतो. फुफ्फुसांवर कोरोना विषाणू हल्ला चढवण्याचं काम करतात.गेल्यावर्षीच्या शेवटच्या काही महिन्यात कोरोना स्ट्रेनमध्ये जे स्पाईक प्रोटिन होतं, त्याची क्षमता कमी झाली होती. म्हणजेच कोरोनाचा विषाणू कमी प्रमाणात शरिराला बाधित करत होता. आत्ताच्या डबल म्युटेशनमुळे दोन प्रकारचे स्पाईक प्रोटीन एकाच स्ट्रेनमध्ये एकत्र आले आहेत.
नवीन विषाणू कोरोनाच्या अँटीबॉडिजनाही जुमानत नाहीये. ज्यामुळे मागच्या दीड महिन्यात 2 वेळा कोरोना झाल्याची उदाहरणं वाढली आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.