डॉ. दंदे हॉस्पिटल येथे कोव्हिड_लसीकरणाला प्रारंभ ! मैत्री परिवारने स्वीकारली उत्तम व्यवस्थेची जबाबदारी !

Share This News

रवीनगर चौकातील डॉ. दंदे हॉस्पिटलमध्ये कोव्हिड-19 प्रतिबंधक लसीकरणाला आजपासून (शनिवार) प्रारंभ झाला. नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी लसीकरण मोहिमेचे उद्घाटन केले.

डॉ. दंदे हॉस्पिटलने यापूर्वी आरोग्यसेवक आणि पोलिसांसाठी देखील लसीकरणाची मोहिम राबविली होती. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा स्थानिक प्रशासनाने हॉस्पिटलवर लसीकरणाची जबाबदारी सोपवली आहे. डॉ. दंदे हॉस्पिटलचे संचालक डॉ. पिनाक दंदे व डॉ. सीमा दंदे यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम आजपासून सुरू झाली. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी लसीकरणासाठी केलेल्या व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले आणि जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. 45 वर्षे व त्यापेक्षा अधिक वर्षाच्या नागरिकांना लस देण्यात येत आहे. लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकरिता डॉ. दंदे फाऊंडेशन आणि मैत्री परिवार यांच्या वतीने रुग्णालयाच्या परिसरात उत्तम व्यवस्था करण्यात येत आहे. यावेळी डॉ. पिनाक दंदे व डॉ. सीमा दंदे यांच्यासह मैत्री परिवारचे अध्यक्ष संजय भेंडे, डॉ. सुशांत मुळे, दीपक वानखेडे, रोहित हिमते यांची उपस्थिती होती. कोव्हिड प्रतिबंधक लस पूर्णपणे सुरक्षित असून वयाच्या निकषांमध्ये पात्र असलेल्या प्रत्येकाने लस घ्यावी, असे आवाहन डॉ. पिनाक दंदे यांनी केले आहे. डॉ. दंदे हॉस्पिटलमध्ये सकाळी 9 ते रात्री 8 या कालावधीत लसीकरण होणार आहे. अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष रुग्णालयात संपर्क साधता येईल.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.