डॉ. छगनभाई पटेल यांचे पदग्रहण
नागपूर |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ६६ व्या राष्ट्रीय अधिवेशनाला डॉ. हेडगेवार स्मारक समिती स्मृती मंदिर येथे प्रारंभ झाला. कार्यक्रमात नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. छगन भाई पटेल यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. निवडणूक अधिकारी आणि राष्ट्रीय सह विद्यार्थी प्रमुख उमा श्रीवास्तव यांनी अभाविपच्या कार्यकारिणीच्या राष्ट्रीय अध्यक्षपद डॉ. छगन भाई पटेल यांच्या नावाची आणि राष्ट्रीय महामंत्रीपदी निधी त्रिपाठी यांच्या नावाची घोषणा केली. संघ आणि दीक्षाभूमी सारख्या पवित्र जागेतून अध्यक्षपदाच्या कार्याची सुरुवात होत आहे , हे माझे भाग्य आहे. तसेच अभाविपचे काम पुढे नेण्यासाठी कसोशीने प्रयत्न करेन, असे पटेल यांनी याप्रसंगी सांगितले. प्रास्ताविक भाषणाच्या सत्रात मंचावर अभाविपचे माळवते अध्यक्ष डॉ. एस. सुबैय्या, महामंत्री निधी त्रिपाठी राष्ट्रीय संघटनमंत्री आशिष चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. एस. सुबैय्या यांनी केले. निधी त्रिपाठी यांनी भाविपच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन तिवारी यांनी केले. |