नागपुरातील डॉ. आंबेडकर कॉलेज सील, १६ जणांना कोरोना |Dr. Nagpur. Ambedkar College Seal, 16 corona

Share This News

नागपूर : एक-दोन नव्हे तर तब्बल १६ जणांना एकाचवेळी कोरोनाची बाधा झाल्यामुळे दीक्षाभूमी शेजारी असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय नागपूर महापालिकेने मंगळवार, २३ फेब्रुवारीला सील केले आहे.
लक्ष्मीनगर झोनचे सहाय्यक आयुक्त गणेश राठोड यांनी सांगितले की, महाविद्यालयात एकाचवेळी १६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे सामूहिक प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने आठवडाभरासाठी डॉ. आंबेडकर कॉलेजचा परिसर सील करण्यात आला आहे. महाविद्यालय प्रशासनाला परिसर सॅनिटाइज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाविद्यालयातील कोरोनाबाधितांवर विविध ठिकाणी उपचार करण्यात येत आहे. आठवडाभरानंतर महाविद्यालयाचा परिसर उघडायचा का, याचा निर्णय घेण्यात येईल, असे राठोड यांनी स्पष्ट केले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.