डॉ. हेडगेवारांनी आम्हाला काय दिले? / Dr. What did the Hedgewars give us?
आज आपला देश म्हणजे अभारतीय विचारांची बजबजपुरी झालेला आहे. आपापसात भांडणे करणे, कोणत्याही विषयावर एकमत न करणे, साध्या विषयाचे विपरीत अर्थ काढणे, बुध्दिभेद करणे,
विदेशी शक्तीच्या सुपाऱ्या घेऊन देशात कलह निर्माण करणे, विदेशी धनावर वैचारिक नाच करणे चालू आहे. अशा वेळी डॉ. हेडगेवारांची प्रकर्षाने आठवण होत राहते. सर्व महापुरुषआपले आहेत आणि ते जे विचारधन ठेवून गेले आहेत, त्याच्या व डॉक्टरांनी ज्ञानाचा दिवा लावला आणि तो आमच्यासारख्या लाखो स्वयंसेवकांच्या मनात सतत तेवत ठेवला, त्या दिव्याच्या प्रकाशात आपल्याला पुढे जायचे आहे. माझ्या वयाच्या सर्व स्वयंसेवकांचा जन्म डॉ. हेडगेवार यांच्या निधनानंतर झालेला आहे. याचा अर्थ आमच्यापैकी कोणीही डॉ. हेडगेवारांना ना पाहिले आहे, ना त्यांची भाषणे ऐकली
असे असतानाही आमच्यासारख्यांच्या जीवनावर सर्वाधिक प्रभाव डॉ. हेडगेवारांचाच आहे. यात कसलीही अतिशयोक्ती नाही. सामान्यपणे प्रत्येक मुलामुलीवर त्यांना जन्म देणाऱ्या आईचा
खोलवरचा प्रभाव असतो. त्या खालोखाल आम्हा स्वयंसेवकांवर डॉ. हेडगेवारांचा प्रभाव असतो. त्यांना न पाहता, न ऐकताही एवढा प्रभाव असण्याचे कारण काय? असा प्रश्न सहजच निर्माण होतो.
तसे पाहू जाता डॉक्टरांनी आम्हाला कसलीही भौतिक गोष्ट दिलेली नाही. त्यांनी सुरू केलेल्या संघामुळे संघात जाणाऱ्या कोणत्याही संघस्वयंसेवकाचा कोणताही भौतिक लाभ होत नाही, झालेच तर नुकसानच होते. स्वातंत्र्यानंतर सगळी राजवट संघविरोधी निघाली, त्यामुळे अंगात प्रचंड गुणवत्ता असणाऱ्या संघस्वयंसेवकांना राज्यसत्तेने अस्पृश्य ठरवून टाकले. सत्तेने त्यांना कसलेही सन्मान दिले नाहीत. त्यांच्या उद्योग-व्यवसायांना कसलेही साहाय्य केले नाही. शिक्षणसंस्थांपुढे अडचणीच अडचणी उभ्या केल्या. तरीही लाखो स्वयंसेवक डॉक्टरांना एकनिष्ठ राहिले. काही स्वार्थासाठी सोडून गेले असतील, परंतु तो मनुष्यस्वभाव आहे म्हणून त्याचे दु:ख करण्याचे कारण नाही.