पायाच्या मोज्यात ड्रग्स,शिपाई अटकेत |Drugs in foot measure, peon arrested

Share This News

नागपूर मध्यवर्ती तुरुंगातील कैद्यांना अंमली पदार्थ पुरवणाऱ्या एका तुरुंग कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे, मंगेश सोळंखे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. नागपूर मध्यवर्ती तुरुंगात कडक सुरक्षा व्यवस्था असूनही  तुरुंगातील कैद्यांना अंमली पदार्थ पुरविण्यात येत असल्याचे यापूर्वीही समोर आले आहे. तुरुंगातील कैद्यांना अंमली पदार्थ पुरविण्यात येत असल्याची गुप्त माहिती तुरुंग अधिकाऱ्यांना मिळाली,सूचनेच्या आधारे गुरुवारी तुरुंगात ड्युटी वर जाणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांची तुरुंगाच्या मुख्य द्वाराजवळ तपासणी करण्यात आली. पाचपैकी २८ वर्षीय मंगेश सोळंखे जवळ २८ ग्राम अंमली पदार्थ सुरक्षा रक्षकांना मिळाला. मंगेशने पायाच्या मोज्यात हा अंमली पदार्थ लपवून ठेवला होता. तुरुंग अधिकाऱ्यांनी पुढील तपासाकरिता मंगेश सोळंखेला धंतोली पोलिसांकडे सुपूर्द केले. तुरुंगातील कर्मचाऱ्यांच्याच साह्याने कैद्यांना अंमली पदार्थ मिळत असल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.   


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.