नागपुरात पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का Earthquake of magnitude 3.3 hits Nagpur

Share This News

नागपुर : मंगळवारी पहातेच्या सुमारास नागपुरजवळ भूकंपाचा सौम्य धक्का बसला.नागपुरपासून ९६ किमी अंतरावरील सिवनी येथे पहाटे चार वाजून दहा मिनिटाने भूकंपणाचा धक्का जाणवला.
याची तीव्रता ३.३ रिष्टर स्केल इतकी होती. नागपूरच्या उत्तर – ईशान्य दिशेने भूकंपाचे केंद्रबिंदू नोंदविण्यात आले.भूकंपामुळे जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या म्हणण्यानुसार,नागपूर येथे मंगळवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास रिष्टर स्केलवर ३.३ तीव्रतेचा भूकंप झाला. नागपुरच्या उत्तर – ईशान्य दिशेला हा भूकंप झाला. मध्यम – तीव्रतेचे भूकंप मणिपूर आणि सिक्कीमला धडकले. मागील महिन्याला सुरुवातीला मुंबईजवळ ३.५ तीव्रतेचा भूकंप झाला होता. भूकंपाचे केंद्रबिंदू मुंबई, महाराष्ट्र, भारत येथून १०४ किमी उत्तर होते.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.