खा. तुमाने भंडारा-गोंदियाचे, चतुर्वेदी गडचिरोलीचे प्रभारी

Share This News

नागपूर : शिवसेनेचा व्याप वाढविण्यासाठी जाहीर केलेले शिवसंपर्क अभियान कोरोनामुळे तूर्तास स्थगिती करण्यात आले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी घेतलेल्या बैठकीत अभियानाबाबत आवश्यक सूचना दिल्या. पक्षाचे खासदार, आमदार आणि अन्य नेत्यांना अभियानाचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. दरम्यान खासदार कृपाल तुमाने यांच्याकडे भंडारा-गोंदियाची तर आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्याकडे गडचिरोलीचे प्रभारीपद देण्यात आले आहे.
जिल्हाप्रमुख व संपर्क प्रमुखांच्या समन्वयातून बुथ पातळीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. संपर्क प्रमुखांकडे अभियान प्रमुखपद आल्यानंतर त्यांनी दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. बुथ पातळीपासून शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत. शिवसंपर्क अभियानासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांची नागपूरच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील अभियान स्थगित ठेवण्यात आले आहे. येथे शिवसंपर्कची जबाबदारी कोणत्याही नेत्याकडे देण्यात आलेली नाही.

विदर्भातील संपर्क अभियान प्रमुख
अमरावती : कुणाचीही नेमणूक नाही
बुलडाणा : आमदार प्रदीप जयस्वाल
अकोला : आमदार राहुल पाटील
यवतमाळ : आमदार रवींद्र फाटक
वाशीम : आमदार नितीन देशमुख
वर्धा : आमदार विलास पोतनीस
नागपूर : आमदार प्रकाश आबिटकर
चंद्रपूर : आमदार नरेंद्र दराडे
गडचिरोली : आमदार दुष्यंत चतुर्वेदी
भंडारा : खासदार कृपाल तुमाने
गोंदिया : खासदार कृपाल तुमाने


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.