गायीच्या शेणापासून इकोफ्रेंडली पेंट, मंगळवारी केंद्रीय मंत्री गडकरी करणार लाँचिंग

Share This News

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मंगळवार, १२ जानेवारी रोजी खादी व ग्रामोद्योग आयोगाने विकसित केलेल्या अभिनव नवीन पेंटचे शुभारंभ त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी होणार आहे. पर्यावरणास अनुकूल, विषारी नसलेला पेंट आहे. हे प्रथम प्रकारचे उत्पादन आहे, ज्यामध्ये एंटी-फंगल, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत.या पेंट मध्ये शेण हा मुख्य घटक आहे. हा पेंट स्वस्त आणि गंधहीन आहे सोबतच भारतीय मानक ब्युरोने प्रमाणित केले आहे.’वेदीक पेंट’ असं या पेंटच नाव आहे.

खादी प्राकृतिक पेंट डिस्टेम्पर पेंट आणि प्लास्टिक इमल्शन पेंट अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. खादी प्राकृत पेंटचे उत्पादन माननीय पंतप्रधानांच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने संरेखित केले गेले आहे. या प्रकल्पाची संकल्पना मार्च २०२० मध्ये अध्यक्ष केव्हीआयसी यांनी केली आणि नंतर कुमारप्पा राष्ट्रीय हस्तनिर्मित पेपर इन्स्टिट्यूट, जयपूर (केव्हीआयसी युनिट) यांनी विकसित केली.

शिसे, पारा, क्रोमियम, आर्सेनिक, कॅडमियम आणि इतर जड धातूंपासून हा पेंट मुक्त आहे. हा पेंट स्थानिक उत्पादनास प्रोत्साहन देईल आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे शाश्वत स्थानिक रोजगार निर्माण करेल. या तंत्रज्ञानामुळे पर्यावरणास अनुकूल उत्पादनांसाठी कच्च्या मालाच्या शेणखताचा वापर वाढेल आणि शेतकरी व गौशाला अधिक उत्पन्न मिळू शकेल. यातून शेतकना / गौशाला दरवर्षी अंदाजे 30,000 रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. शेणाच्या वापरामुळे वातावरण स्वच्छ होईल व नाले बंद होण्यास प्रतिबंध होईल. खादी प्राकृतिक डिस्टेंपर आणि इमल्शन पेंट्सची 3 नामांकित राष्ट्रीय प्रयोगशाळांमध्ये तपासणी करण्यात आली आहे


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.