रत्नाकर गुट्टेवर ईडीची कारवाई

Share This News

२५५ कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई
राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार साखरसम्राट रत्नाकर गुट्टे यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीने र%ाकर गुट्टे यांची २५५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ६३५ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीने दिली आहे.
ईडीने मनी लॉण्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करत गंगाखेड शुगर अँण्ड एनर्जी लिमिटेड, योगेश्‍वरी हॅचरीज आणि गंगाखेड सोलार पॉवर लिमिटेडमधील संपत्तीवर कारवाई केली आहे. शुगर अँण्ड एनर्जी लिमिटेड र%ाकर गुट्टे यांच्या मालकीची आहे. ते कंपनीचे संचालकही आहेत.
र%ाकर गुट्टे इतरांच्या मदतीने गरीब शेतकर्‍यांसाठी असणार्‍या कृषी कर्ज योजनेचा गैरफायदा घेतल्याचा ईडीचा आरोप आहे. या कर्ज योजनेअंतर्गत बँका ऊस शेतकर्‍यांना (जमिनीच्या आधारे) पीकांसाठी महत्वाच्या गोष्टी उदाहरणार्थ बियाणे, खते, ट्रॅक्टर, पंप आणि इतर गोष्टी खरेदी करण्यासाठी पैसा देते.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, पीक खरेदी करताना र%ाकर गुट्टे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी शेतकर्‍यांची माहिती घेत एक डेटा बँक तयार केला. यानंतर गंगाखेड साखर कारखाना शेतकर्‍यांसाठी कृषी कर्ज मिळवण्याच्या उद्देशाने काही बँकांशी जोडला गेला. थोडक्यात बँकांसाठी ते एजंट झाले आणि शेतकर्‍यांच्या माहितीची पडताळणी करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली. ईडीने सांगितले आहे की, तपासात गंगाखेड साखर कारखान्याने शेतकर्‍यांच्या उपलब्ध माहितीचा गैरफायदा घेत त्यांच्या नावे कर्ज घेतले. बँकांनी २0१२-१३ ते २0१६-१७ दरम्यान जवळपास ७७२ कोटींचे कर्ज मंजूर केले आणि ६३२ कोटींची वाटप केले. हे पैसे लाभार्थी शेतकर्‍यांपर्यंत कधी पोहोचलेच नाहीत. दुसरीकडे गंगाखेड साखर कारखान्याने शेतकर्‍यांकडून मिळालेल्या स्वाक्षरीचा फायदा घेत हे पैसे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये टाकले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.