आ. सरनाईकांचे निकटवर्तीय प्रसिद्ध बिल्डर योगेश देशमुख यांना ईडीकडून अटक

Share This News

मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी (मनी लाँड्रिंग) प्रसिद्ध बिल्डर योगेश देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. विशेष म्हणजे देशमुख हे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे सरनाईक यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. देशमुख यांना अटक केल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत दिली आहे. याआधी ईडीने सरनाईक यांचा सर्वांत जवळचा मित्र अमित चंदेल यालाही अटक केली होती. 
१७ मार्च रोजी ईडीने योगेश देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याआधी ईडीने २४ नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक आणि त्यांचे पुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांचे घर, कार्यालय, हॉटेल अशा एकूण १० ठिकाणी छापेमारी केली होती.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.