वर्षा संजय राऊत यांना पुन्हा ईडीचं समन्स ED summons Varsha Sanjay Raut again

Share This News

वर्षा संजय राऊत यांना पुन्हा ईडीचं समन्स, 11 जानेवारीला चौकशीसाठी हजेरीचे आदेश, वर्षा राऊत यांची चार जानेवारी रोजी चार तास चौकशी, परंतु चौकशी पूर्ण न झाल्याने ईडीचे पुन्हा समन्स

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी (Varsha Raut) यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) पुन्हा चौकशी होणार आहे. त्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नवे समन्स पाठवले आहे. त्यानुसार वर्षा राऊत यांना 11 जानेवारील पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. (ED issue fresh summons to Varsha Raut for probe)

यापूर्वी 4 जानेवारीला पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास चार तास वर्षा राऊत यांना प्रश्न विचारले होते. प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी संजय व वर्षा राऊत यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.