चंद्रपुरात गेल्या २४ तासात आठ करोनामुक्त ; सात पॉझिटिव्ह
चंद्रपूर 9 फेब्रुवारी – जिल्ह्यात मागील २४ तासात आठ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर सात करोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या २३ हजार १५३ झाली असून त्यापैकी बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ६६९ झाली आहे. सध्या ९२ बाधितांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत २ लाख ४ हजार १८० नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १ लाख ७९ हजार ९१ नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३९२ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३५४, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १५, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.