एकनाथ निमगडे हत्या प्रकरण: फडणवीस यांच्या नागपूर निवासस्थानी राष्ट्रवादीचे आंदोलन

Share This News

नागपूरमधील बहुचर्चित एकनाथ निमगडे हत्याप्रकरणात भाजपाच्या काही लोकांचा हात असल्याचे खळबळजनक आरोप राष्ट्रावादी काँग्रेसने केला आहे. यातच आज राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन सुरु केले आहे. यावेळी पोलिसांनी फडणवीसांच्या बंगल्याजवळ जाण्यापासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अडवले. तसेच बंगल्याबाहेर पोलिसांचे बँरिगेट्सही लावण्यात आले आहेत. परंतु कार्यकर्त्यांनी फडणवीस आणि भाजपाविरोधात जोरदार घोषणा केली.

नागपूरात २००१६ मध्ये आर्किटेक्चर एकनाथ निमगडे हत्या प्रकरण घडले होते. याप्रकरणात रणजीत सफेलकर या गुंडाचे नाव समोर आले आहे. सफेलकर हा भाजपाच्या काही नेत्यांच्या अगदी जवळचा होता. असा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. तर या प्रकरणात भाजपाच्या काही नेत्यांचाही हात असा असा आरोप कार्यकर्ते करत आहेत. यामुळे आज राष्ट्रवादीच्या २० ते २५ कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, मुर्दाबाद अशा जोरदार घोषणा दिल्या.

नुकताच नागपुर पोलिसांनी एकनाथ निमगडे हत्या प्रकरणाचा उलघडा केला होता. यात एकनाथ निमगडेची हत्या सुपारी देऊन झाल्याचे उघड झाले. याप्रकणाचा गेली ५ वर्षे सीबीआय तपास करत होते.  नागपूरमधील कुख्यात गुंड रणजीत सफेलकर आणि त्याचा साथीदार कालू हाटे याने निमगडे यांची हत्या करण्यासाठी ५ कोटी रुपयांची सुपारी घेतली होती. यानंतर २०२१६ मध्ये उत्तरप्रदेशमधील काही गुंडांच्या मदतीने निमगडे यांची हत्या करण्यात आली. ही माहिती नागपूर पोलिसांच्या तपासादरम्यान बाहेर आली. मात्र ही सुपारी कोणी दिली होती ? याची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे कार्यकर्तेचे आरोप करत आहेत की, रणजीत सफेलकर हा भाजपाच्य जवळचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे पोलिसांनी याचा तपास करावा अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत.

वर्धा मार्गावरील हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉइंटच्या मागे निमगडे यांची मालकीची साडेपाच एकर जागा आहे. या जागेच्या वाद न्यायालयात सुरु आहे. सुमारे ५०० कोटी रुपये किंमतीच्या भूखंडाच्या वादातून यांची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. या प्रकरणात एका नेत्यासह पाचजण संशयित आहे. या हत्येची सुपारी रणजितला कोणी दिली असा प्रश्न राष्ट्रवादीने उपस्थित केला असून यात भाजपाचा हात असल्याचा आरोप केला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.