एकनाथ निमगडे यांच्या हत्येचा उलगडा Eknath Nimgade’s murder revealed

Share This News

नागपूर : उपराजधानीतील बहुचर्चीत वास्तूविशारद एकनाथ निमगडे हत्याकांडाचा उलगडा लावण्यात नागपूर पोलिस यशस्वी ठरले. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. सीबीआयला आरोपी मिळाले नाहीत. या प्रकरणात नऊ आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ निमगडे यांची हत्या कुख्यात रणजीत सफेलकर याने ५ कोटी रुपयांची सुपारी घेऊन इतर १३ जणांकडून करवून घेतली, अशी माहिती दिली. पोलिसांनी आतापर्यंत राजा, नवाब ऊर्फ नब्बू छोटेसाब अशरफी, मुश्ताक ऊर्फ मोशू छोटेसाब अशरफी, शाहबाज अशरफी, राजासह इतर नऊ जणांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली. पोलिसांकडून यांची चौकशी सुरू असतानाच रणजीत सफेलकर, शरद ऊर्फ कालू हाटे, नब्बू, परवेज आणि बाबा हे फरार आहेत. एकनाथ निमगडे यांच्या खुनासाठी जुलै २०१६ पासून आरोपींची योजना सुरू होती. याकरिता सफेलकरला एका व्यक्तीकडून पाच कोटींची सुपारी मिळाली होती


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.