चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्ती ठार, ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात एका वृद्ध व्यक्ती ठार झाल आहे. दत्तू मडवी असे मृत व्यक्तीचे नाव असून ते कालपासून बेपत्ता होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील मानोरालगत असलेल्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात दत्तु मडावी (वय 60) हे जागीच ठार झाले आहेत. मडावी कालपासून बेपत्ता असल्यामुळे घरच्यांनी जंगलात शोध घेतला असता एका ठिकाणी पाय तुटलेला आढळला. शंका येताच शोधाशोध केली असता मडवी यांचा मृतदेह काही अंतरावर सापडला. गावाच्या सीमेवर ही घटना घडल्याने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.