सरपंच पदासाठी निवडणूक ११ फेब्रुवारीला

Share This News

नागपूर
सरपंच पदासाठीचे आरक्षण अनेक ठिकाणी जाहीर झाले असून, आता ११ फेब्रुवारीला सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. याच दिवसापासून ग्रामपंचायत ‘बॉडी’ चा कार्यकाळ सुरू होणार आहे. कोरोनामुळे राज्य सरकारने निवडणुकी पुढे ढकलल्या त्यामुळे कार्यकाळ संपुष्टात आलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. जानेवारीत या ग्रामपंचायतींसाठी निवडणुका घेण्यात आल्या.

नागपूर जिल्ह्यात १३0 ग्रामपंचायतींकरता निवडणूक घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. एक ग्रामपंचायतमधील उमेदवाराचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील १२९ ग्रामपंचायतींकरता निवडणूक प्रक्रिया पार पडली. ४ फेब्रवारीपयर्ंत सरपंच आरक्षणाची प्रक्रिया सर्व तालुक्यात पूर्ण करायची आहे. मिळालेल्या माहितीनुसार हिंगणा, भिवापूर, उमरेड, मौदा, कुही, सावनेर, काटोल, नरखेड, रामटेक, पराशिवनी, नागपूर ग्रामीण तालुक्यात सरपंच पदाकरिता आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर कळमेश्‍वर व कामठीत सरपंच पदाच्या आरक्षणाची प्रक्रिया गुरुवारला होणार आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण मागील प्रमाणेच कायम आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.