वर्धा : पुलगाव न.प. प्रशासनने अतिक्रमण हटाव मोहीम
शहरातील गांधी चौक येथील भाजीपाला विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण हटवायचे मोहीम आज दुपारी १ वाजता नगरपालिकाच्या चमूने केली।गांधी चौक येथे अनेक दिवसांपासून भाजीपाला विक्रेता आपला व्यवसाय करीत आहे नगरपालिकाद्वारे त्यांना ८८ ची जागा महात्मा गांधी बालोद्यानला लागून माकिर्ंग करून नगरपालिका प्रशासनाने दिली आहे. परंतु दिलेल्या जागे व्यतिरिक्त हे भाजीपाला विक्रेते आपली दुकान थाटून बसल्यामुळे येथून येण्यास व जाण्यासाठी त्रास निर्माण होत होते, गांधी चौक हा गावातील मध्य भाग असून येथे रहिवासी लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, अशी तक्रार वारंवार येथील नगरसेवक व येथील रहिवासी नागरिकांनी नगरपालिकामध्ये केली होती. या संदर्भात ४ दिवसापूर्वी मौखिक सांगण्यात आली असून सुद्धा या लोकांनी आपले अतिरीक्त अतिक्रमण काढले नसल्याने आज नगरपालिकाद्वारे ते हटविण्यात आल. या कार्यवाहीमध्ये नगरपालिका इंजिनिअर नितीन जयस्वाल, शाहरुख , स्वच्छता विभागाचे मनोज खोडे, बांधकाम विभागाचे रवि पतालिया, अनिल अंबादे, अशोक चौधरी, अश्विन फूलझाले, नवलाखे, अग्रवाल, दिनेश उसरे, सचिन उसरे, भैरवनाथ काळे (३७) विभाग यांनी ही संयुक्त कार्यवाही केली . |