वीजदर कमी करण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आदेश | Energy Minister’s order to reduce electricity bill

Share This News

नागपूर : वीज ग्राहकांमध्ये वाढत असलेला असंतोष कमी करण्यासाठी ऊर्जा विभागाने आता विजेचे दर कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. त्यानुसार घरगुती वीजवापरासह वाणिज्यिक आणि औद्योगिक वीजदरांत कपात करण्याबाबत नियोजन करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत यांनी दिले.
देशातील इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रात औद्योगिक ग्राहकांचे वीजदर जास्त आहेत. त्यामुळे उद्योग वाढीला अडथळा निर्माण झाला आहे. अशात राज्यातील उद्योगांचे वीजदर कमी करणे गरजेचे आहे. वीजदर किमान एक रुपया प्रतियुनिटने कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि सोबतच घरगुती तसेच वाणिज्यिक दरही कमी करण्यासाठी नियोजन करा, असे आदेश डॉ. राऊत यांनी महावितरणला दिले आहेत. वीजबिलावरून महाराष्ट्रात भाजपने डॉ. राऊत यांना लक्ष्य केले आहे. कोरोना लॉकडाउन काळातील वीजबिल माफ करण्याची मागणीही भाजपने रेटून धरली आहे. त्यावरून ग्राहकांमध्ये असंतोष वाढत आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.