थकबाकीदार शेतकऱ्यांना ऊर्जामंत्र्यांचा दिलासा

Share This News

नागपूर : थकबाकीवरून महावितरणने कृषिपंपधारकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात सुरुवात केली आहे. त्यामुळे विरोधकांनी महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना लक्ष्य केले आहे. अशात राज्यातील थकबाकीदार कृषिपंपधारकांना ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी बुधवारी दिलासा दिला आहे. सप्टेंबर २०२०पर्यंत थकबाकी असलेल्या पंपधारकांची वीज न कापण्याचे आदेश ऊर्जामंत्र्यांनी दिले आहेत.

थकबाकीदार कृषिपंपधारकांना वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी आता तीन वर्षांची मुदत देण्यात आली आहे. सप्टेंबर २०२० पर्यंतच्या थकबाकीवर कोणतेही व्याज किंवा विलंबशुल्क न लावण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. यासंदर्भात महावितरणच्या मुख्यालयाने खास परिपत्रक प्रकाशित केले आहे. परिपत्रकानुसार सप्टेंबर आणि डिसेंबरमध्ये देण्यात आलेल्या वीजबिलाची भरणा न करणाऱ्यांचा पुरवठा खंडीत केला जाणार आहे.

कोरोनामुळे राज्यातील वीजबिलांची थकबाकी आता ७१,५०६ कोटींवर पोहोचली आहे. यातील ४४,७६७ कोटींची थकबाकी कृषी जोडण्यांची आहे. राज्यात एकूण ४२ लाख ५० हजार ८१३ कृषी ग्राहक आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.