न्यायाधीश म्हणून काम-अनुभव समृद्ध करणारा; सरन्यायाधीश बोबडे निवृत्त

Share This News

नवी दिल्ली : ऐतिहासिक अयोध्या प्रकरण, नागरिकत्व सुधारण कायदा, स्थलांतरीत मजूर, कृषी कायदे यांसहीत अनेक मुद्यांवर सुनावणी करणारे सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे हे आज २३ एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत. भारताचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणारे न्यायमूर्ती बोबडे यांच्या कामकाजाचा आजचा अखेरचा दिवस… याच निमित्तानं शुक्रवारी सरन्यायाधीशांनी आपल्या कारकीर्दीवर समाधान व्यक्त केलं.
आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी सरन्यायाधीशांनी स्वत:हून लक्ष घातलेल्या कोव्हिड १९ संदर्भात सुनावणी केली. न्या. शरद बोबडे यांच्याकडून देशाच्या सरन्यायाधीशपदाची सूत्रं न्यायमूर्ती एन व्ही रमणा यांच्याकडे सोपवण्यात येणार आहेत.
‘या अंतिम सुनावणी दरम्यान संमिश्र भावना आहेत. मी अगोदरदेखील खंडपीठाचं कामकाज पाहिलं परंतु, या भावना इतक्या संमिश्र आहेत की स्पष्टपणे व्यक्तही करू शकणार नाही’ असं सरन्यायाधीश यांनी आपल्या निरोपाच्या भाषणादरम्यान म्हटलं. सोबतच, न्यायाधीश म्हणून केलेलं काम आणि अनुभव समृद्ध करणारा होता, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
सरन्यायाधीश शरद बोबडे हे पहिले मुख्य न्यायाधीश ठरलेत ज्यांच्या कारकीर्दीत सर्वोच्च न्यायालयात एकाही न्यायाधीशाची नियुक्ती झाली नाही.
करोना संक्रमण काळ सर्वांसाठीच आव्हानात्मक ठरला. तसाच तो सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयासाठीही आव्हानात्मक होता. परंतु, या काळातही न्या. बोबडे यांनी ५७ प्रकरणांची (२२ मार्च २०२० ते २० एप्रिल २०२१) सुनावणी केली. त्यांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात ९० प्रकरणांची सुनावणी हाताळली.
उल्लेखनीय म्हणजे, २०२० साली सर्वोच्च न्यायालयानं १३७० प्रकरणांत निर्णय सुनावला होता परंतु, करोना संक्रमण फैलावत असताना २०२० साली ही संख्या ६९७ वर सीमित राहिली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.