राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळा ‘आदर्श मॉडेल’ म्हणून उभी करा : अजित पवार

Share This News

पुणे : राज्यातील नागरिकांना नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शुद्ध, स्वच्छ पाणी दिले गेले पाहिजे. पाणी देणे हे पुण्याचे काम आहे. नागरिकांना पाणी देत असतांना त्यांच्या आरोग्याचा प्राधान्याने विचार करत राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळा देशात ‘आदर्श मॉडेल’ म्हणून उभी करण्याचा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या. प्रयोगशाळा उभारणीसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळा इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन वडगाव बुद्रुक येथे झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ संजय चहांदे यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.


पवार म्हणाले, प्रयोगशाळेच्या इमारतीचे काम करतांना कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे. पुण्याचा वैभवात भर पाडणारी वास्तू म्हणून उभारणी झाली पाहिजे असे म्हणत राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळेच्या माध्यमातून दर्जेदार यंत्रणा उभी राहत आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून जनतेची तहान भागविण्याचे काम केले जाते. नागरिकांना शुद्ध, स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याचा कामी यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करत राज्यातील गोरगरीब, वंचित नागरिकांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 
भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 मधील तरतुदीनुसार पाणी हा प्रत्येक नागरिकांचा मूलभूत हक्क असून या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध व सुरक्षित पाणी उपलब्ध करण्याचे राज्य शासनाचे प्रयत्न असल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.


पुढे ते म्हणाले, राज्यातील सर्व जनतेला पिण्याचे शुद्ध व सुरक्षित पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य प्रयोगशाळेचे महत्त्वाचे योगदान असणार आहे. राज्यात विभागीय, जिल्हा व उप विभागीय स्तरावर आजमितीस 175 प्रयोगशाळा कार्यरत आहेत.  


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.