दिग्रस मध्ये तीन पत्रकार निवडून आल्यामुळे पत्रकारांमध्ये उल्हास
तालुक्यातील ग्रामपंचायतचा काल निकाल लागला असून एकूण 891 उमेदवारापैकी 420 लोकांना निवडून द्यायचे होते यामध्ये निवडणुकीच्या अगोदरच 49 उमेदवार बिनविरोध आले होते यात चिंचोली क्रमांक 1 आणि मरसुळ हे दोन्ही ग्रामपंचायत बिनविरोध जाहीर करण्यात आले होते तर आज 371 उमेदवारांचा निकाल जाहीर करण्यात आला , विशेष म्हणजे माजी सभापती मिलिंद मानकर आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या संयुक्त गटातून 11 पैकी 7 उमेदवारांना निवडून देऊन एक वेगळा इतिहास रचला सोबतच प्रहार’ने सुद्धा ग्रामपंचायत दिग्रस तालुक्यात आपले खाते उघडले असून बाकी ठिकाणी संमिश्र प्रतिसाद जनतेने दिला आहे . दिग्रस च्या राजकारणात एक विशेष बदल म्हणजे यावेळी पत्रकारांनी या निवडणुकीत भाग घेतला होता आणि पाच पत्रकारांन पैकी तीन पत्रकार हे निवडून आल्यामुळे पत्रकारां मध्ये आनंदाचे हर्ष उल्हासाचे वातावरण दिसून आले