एसीबीची कारवाई : दोन अधिकार्‍यांना रंगेहात अटक

Share This News

काटोलमधील नगररचना विभागात खळबळ : २.५0 लाखांची मागितली लाच

काटोल
काटोल नगर परिषदअंतर्गत येणार्‍या नगर रचना विभागाच्या दोन अधिकार्‍यांना नागपूर येथील लाचलुचपत पथकाच्या चमूने सव्वा लाखाची लाच घेताना धवड ले-आऊट येथील गायकवाड यांच्या घरी रंगेहात अटक केली. ही घटना शनिवारी (६ फेब्रुवारी) दुपारी तीन वाजता घडली. यामुळे काटोल शहरातील शासकीय विभागात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एकाची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोपी दिनेश गायकवाड सहायक नगर रचनाकार विपीन भादककार संशयित भारत मिटकीने रचना सहायक यांना काटोल येथील आकाश महंत व राधेश्याम बासेवार यांनी गहाण भूखंड सर्व्हे नंबर ६७१ बटे २ या भूखंडावरील प्लॉट क्रमांक ३५ ची झालेल्या विकासकामाचे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली असता सदर काटोल नगर परिषद अंतर्गत येणार्‍या नगररचना विभाग कार्यालयातील दिनेश गायकवाड व विपीन भादककार संशयित भारत मिटकीने या अधिकार्‍यांनी आकाश महंत व राधेश्याम बासेवार यांना अडीच लाखांची लाच मागितली तेव्हा फिर्यादीने आरोपींना सव्वा लाख रुपये देण्याचे कबूल केले. या घटनेची तक्रार फिर्यादीने नागपूर येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांना केली. शुक्रवारी (५ फेब्रुवारी) सदर लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी या घटनेची पडताळणी केली असता यात दोन आरोपी आढळले. त्या दिवशी फिर्यादींनी आरोपींना पंचवीस हजार रुपये नगद दिले होते. शनिवारी लाचलुचपत विभागाच्या चमूनी व फिर्यादीने आरोपीविरुद्ध सापळा रचून दुपारी तीन वाजता धवड ले-आउट येथील दिनेश गायकवाड यांच्या घरी उर्वरित एक लाख रुपये घेऊन फिर्यादींना पाठविले. सदर दोन आरोपी लाच घेताना पोलिस अधिकार्‍यांना आढळले. तेव्हा त्यांना रंगेहात अटक करण्यात आली. या घटनेची माहिती काटोल शहरात पोहोचताच सर्व शासकीय विभागात एकच खळबळ उडाली. सदर दोन आरोपींविरुद्ध लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, विनोद झाडे, लक्ष्मण परतेती, शरीफ अहमद, महिला पोलिस कर्मचारी शालिनी जांभूळकर व इतर अधिकार्‍यांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.