बुलढाणा आगारातील महिला कंडक्टरचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

Share This News

बुलढाणा जिल्ह्यातिल चिखली तालुक्यातील अंतरि खेडेकर या गावाजवाळ  शुक्रवारी दुपारी बुलढाणा आगारात काम करणाऱ्या महिला कंडक्टर चा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. मृतक २५ वर्षीय माधुरी मोरे अस या महिला कंडक्टर च नाव असून ती मुळ अंतरि खेडेकर या गावाची रहिवासी होती ती सध्या बुलढाणा आगारात कंडक्टर म्हणून कार्यरत होती , मिळालेल्या माहितीनुसार मेरा खुर्द परिसराच्या सुनसान जागी गावाच्या लोकांना या मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोड्यात पडलेला दिसला याची माहिती लागलीच   दुपारी अंढेरा  पोलिसांना देण्यात आली , अंढेरा पोलीस व फोरेंसिक टीम घटनास्थळी पोहचली आणि त्यांनी स्पॉट पंचनामा करून मृतदेह पोस्टमाटमी साठी शासकीय रुग्णालयात हलविला

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतक माधुरी चा ५ वर्षांपूर्वी तिच्या  नवऱ्याकडून घटस्फोट झाला होता , त्यावेळी ती जाफराबाद आगारात काम करायची मात्र तेव्हा एक तरुण तिची बस मध्ये नेहमी छेड काढायचा त्यामुळे कंटाळून तिने तिची बदली बुलढाणा आगारात करून घेतली होती , पोलीस या दिशेने देखील  तपास करीत आहेत , माधुरीच्या मृतदेहावरून तिच्यावर हत्येआधी अतिप्रसंग झाल्याचा देखील संशय व्यक्त करण्यात येत आहे , तिचा पोस्टमार्टम रीपोर्ट येताच या बाबीचा देखील उलगडा होईल , माधुरीच्या हत्येच्या घटनेने तिच्या आईवडिलांवर दुःखाचं डोंगर ओसांडल आहे अंढेरा पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.