कोविड केंद्राच्या ऑक्सीजन सिलेंडर मधील लिकेजमूळे स्फोट

Share This News

भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड केंद्राला पुरवठा होणाऱ्या ऑक्सिजनच्या सेंट्रल लाईन मधील लिकेजमुळे स्फोट झाला. ही दुर्घटना शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड ब्लॉक आहे. सध्या रुग्णांची वाढती संख्या बघता जिल्हा सामान्य रुग्णालयातील पॉझिटिव्ह रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून नेत्र विभागात नव्याने कोविंड युनिट सुरू करण्यात आले आहे.हे युनिट  शुक्रवारलाच सुरू झाले.या युनिटमधील रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करता यावा यासाठी ऑक्सिजनची सेंट्रल लाईन तयार केली आहे. ही सेंट्रल लाईन अचानक लिकेज झाली. यामुळे तिथे स्फोट झाला. स्फोटाचा आवाज येताच कोविड केंद्राबाहेर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन आग तातडीने विझविली. दरम्यान,या केंद्रामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना तातडीने इतरत्र सुरक्षित ठिकाणी हलविले.यामुळे मोठी दुर्घटना टळली. कोबी केंद्र मध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर सर्व उपचार घेणाऱ्या रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केली असून सर्व रुग्ण सुरक्षित आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.