विस्फोटक परिस्थिती मे अखेरपर्यंत राहणार : वडेट्टीवार

Share This News

नागपूर : तज्ज्ञांच्या मते मे अखेरीपर्यंत राज्यात विस्फोटक परिस्थिती राहील. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असेल तर 14 दिवसांच्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाहीच, असे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.


वीकेंड लॉकडाऊन लावल्यानंतरही आज राज्यभर गर्दी होत आहे. ही गर्दी अतिशय घातक आहे. त्यामुळे नागरिकांची गर्दी रोखायची असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. भविष्यात ही परिस्थिती अधिक भयावह होणार आहे. या कोरोनातून वाचायचं असेल तर अजिबात घराबाहेर पडू नका. लॉकडाऊन होईल तेव्हा होईल. परंतु, तुम्ही घराबाहेर पडू नका. जर परिस्थिती अशीच राहिली तर महाराष्ट्रात मृतदेहांचा खच पडेल, अशी भीती वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. मे अखेर पर्यंत राज्यात कोरोनाची विस्फोटक परिस्थिती राहिल. त्यामुळे लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. राज्यात शंभर टक्के लॉकडाऊन होणार असल्याचं सांगतानाच उद्या गुढीपाडवा आहे आणि 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्यामुळे 15 एप्रिल रोजी लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.