तिवसा येथे आढळली स्फोटके, एकाला अटक, दुसरा फरार Explosives found at Tivasa, one arrested, another absconding

Share This News

तिवसा –येथील पंचवटी चौकामध्ये तब्बल पंचवीस किलो वजनाचे २00 जिलेटिन कांड्या पोलिसांनी जप्त केले आहे. तर त्याचबरोबर जवळपास दोनशे नग डिटोनेटरसुद्धा पोलिसांनी हस्तगत केल्याने खळबळ उडाली आहे .
तिवसा पो.स्टे.चे वाहतूक पोलिस विशाल सूर्यवंशी व प्रवीण चव्हाण पंचवटी चौकात कर्तव्यावर असताना नागपूरकडून दारू येत असल्याच्या माहितीनुसार तपासणी करीत असताना दुचाकीवरून पोते घेऊन जाणार्‍या चालकास थांबविण्याचा प्रयत्न

केला. मात्र, त्यांनी पळ काढून पोते काही अंतरावर फेकून दिले.

 पाठलाग केला असता सदर आरोपीने त्याच्याजवळील जिलेटिन व डेटोनेटरने भरलेली बॅग घेऊन पळ काढला. पळालेल्या युवकाचा संदर्भात माहिती घेतल्यानंतर सदर युवक हा सुमीत अनिल सोनोने राहणार सातरगाव तिवसा असून, तो वंचित बहुजन आघाडीचा तिवसा तालुकाध्यक्ष आहे. पोलिसांनी सदर आरोपीला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने पंचवीस किलो स्फोटके डिटोनेटर हे अंकुश लांडगे, करजगाव लोणी याला विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी अंकुश लांडगे याच्याकडे मोर्चा ओढावल्याबरोबर व त्याची चाहूल आरोपीला लागताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी सदर ठिकाणावरून दोनशे नग जिलेटिन व दोनशे नॉक डिटोनेटर हस्तगत केली आहेत. मात्र, ही जिलेटिन व डिटोनेटर स्फोटके नेमके कशासाठी व कुणाच्या आदेशाने आणण्यात आली, याचा तपास आता पोलिस करत आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.