अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ, विद्यार्थ्यांना दिलासा
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला ५ डिसेंबरपासून सुरुवात झाली. परंतु विविध अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही ‘ऑनलाईन’ अर्ज भरता आलेले नाहीत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी आता १९ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात विविध विद्यार्थी संघटनांनीदेखील मागणी केली होती. विद्यापीठाने प्रवेशप्रक्रियेचे सुधारित वेळापत्रकदेखील जारी केले आहे. ‘कोरोना’मुळे लांबलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेचा मुहूर्त अखेर डिसेंबर महिन्यात निघाला. ‘कोरोना’ची एकूण स्थिती व हाती असलेला कमी वेळ लक्षात घेता, विद्यापीठाने ऑनलाईन प्रणालीद्वारे केंद्रीभूत प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे.