अत्यंत दुदैवी, फेऱ्या मारुनही मिळाला नाही बेड, रुग्णाचा गाडीतच मृत्यू

Share This News

चंद्रपूर : रुग्णालयाच्या चकरा घालूनही बेड न मिळाल्याने कोरोनाग्रस्त रुग्णाचा स्वतःच्या गाडीत मृत्यू झाला. उपचार न मिळाल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात बस स्थानकावरच रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कोरोना स्थितीची भीषणता अधोरेखित करणारी आणखी एक घटना समोर आली आहे. उपचारांअभावी 40 वर्षीय व्यक्तीने कारमध्येच प्राण सोडले.
चंद्रपूरमध्ये राहणाऱ्या 40 वर्षीय प्रविण दुर्गे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दुर्गे हे चंद्रपूर शहरातील नगीनाबाग परिसरात वास्तव्याला होते. प्रकृती बिघडल्यानंतर काल (रविवारी) ते नातेवाईकांसह रुग्णालयात फिरत होते. उपचार आणि बेड मिळावा यासाठी ते अनेक रुग्णालयांमध्ये फेऱ्या मारत होते. अखेरपर्यंत प्रवीण दुर्गे यांना कुठेही उपचार किंवा बेडची सुविधा मिळाली नाही. शेवटी सोमवारी पहाटे आपल्या अल्टो गाडीतच त्यांचा मृत्यू झाला. दुर्गेंच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी शासकीय कोव्हिड रुग्णालय परिसरातच टाहो फोडला. उपचार न मिळाल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात बस स्थानकावरच रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना कालच घडली होती. ब्रम्हपुरी शहरातील गोविंदा निकेश्वर (50) यांना कोरोनाची लागण झाली होती.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.