गोंदियात जहाल नक्षलवाद्याला पकडले

Share This News

गोंदिया : नक्षली कारवायांनी गोंदिया जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे गडचिरोली प्रमाणे गोंदिया पोलिसांनीही नक्षलविरोधी अभियान तीव्र केले आहे. अशात मध्य प्रदेश सीमेवरील बालाघाट जिल्ह्याच्या लांजी पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात येणाऱ्या मलकुआच्या जंगलात सोमवार, ८ मार्चला पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.


पोलिस आण नक्षल्यांमध्ये ही चकमक बराच वेळपर्यंत सुरू होती. पोलिसांना वाढता दबाव पाहता नक्षली जंगलात पळाले. मात्र एक जहाल नक्षलवादी पोलिसांच्या हाती लागला. श्यामलाल उर्फ मोतीराम धुर्वे हे या नक्षलवाद्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. श्यामलालवर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये १४ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. श्यामलाल हा मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध तीनही राज्यांमध्ये हत्यांचे सुमारे ८४ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती बालाघाटचे पोलिस अधीक्षक अभिषेक तिवारी यांनी दिली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.