शासकीय रुग्णालयातील औषधांचा काळाबाजार थांबवून सुविधा द्या-भाजयुमोचे निवेदन

Share This News

गोंदिया,दि.09ः- भारतीय जनता युवा मोर्चा गोंदियाच्यावतीने शहरातील शासकीय रुग्णालयात सुरु असलेल्या अव्यवस्थेला घेऊन उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते मार्फेत जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.शहर अध्यक्ष पलाश लालवानी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात रेमडीसिविर इंजेक्शनचा पुरवठा खासगी रुग्णालयात करुन देण्यात यावे.शासकीय रुग्णालयातील कोरोना रुग्णांकरीता बेडची संख्या वाढविण्यात यावे,सोबतच डाँक्टरांची नियुक्ती  व्यवस्थित उपचार होण्यासंदर्भात निर्देश देण्यात यावे.शहरात आरटीपीसीआर तपासणी केंद्राची संख्या वाढविण्यात यावे.कोरोनाबाधीत रुग्ण असलेल्या कंटेनमेंट परिसरात त्वरीत फवारणी करण्यात यावे.शासकीय रुग्णालयातील औषधांचा काळाबाजार थांबविण्यात यावे.प्लाझ्मा मशीन सुरु करुन स्थानिक पातळीवरच प्लाझ्मा उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली.यावेळी  प्रतीक तिवारी,ऋतुराज मिश्रा, विन्नी गुलाटी,पुरु ठाकरे,अर्पित पांडे,निखिल मुरकुटे आदि उपस्थित होते.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.